
पुण्यात कोरोनामुळे घरात क्वारंटाईन असल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संदीप भोसले असे तरुणाचे नाव असून तो सहकारनगर भागात राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप कुटुंबासोबत सहकारनगर परिसरात अनेक वर्षापासून राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी संदीप यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी संदीपला होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संदीप ओमकार सोसायटीमधील घरी राहत होते. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना सासरी पाठविले होते.
मंगळवारी संदीप यांचा भाउ त्यांना सकाळचा नाष्टा घेऊन घरी गेला होता. त्यावेळी भाऊ संदीपने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले त्यानंतर संदीपला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे.




























































