हाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोवलून

हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत स्विस आणि हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणारा हिंदुस्थानाचा समीर वर्मा याला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्याच्या पराभवाबरोबरच हिंदुस्थानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्याआधी हिंदुस्थानी किदाम्बी श्रीकांतला उपांत्यपूर्व लढतीत जपानच्या केंटा निशिमोटोने सरळ गेममध्ये 21-17 ,21-13 असे पराभूत केले होते.

यजमान देशाच्या ली चेक यू याने समीरला 15-21, 21-19, 11-21 असे पराभूत केले. पहिला गेम यू याने 21-15 असा जिंकला होता, मात्र दुसरा गेम समीरने 21-19 असा जिंकल्यामुळे शेवटचा गेम निर्णायक ठरला. त्या गेममध्ये मात्र यूने 21-11 अशी समीरला मात दिली आणि सामना खिशात घातला.