नोकरदार महिलांसाठी ताडदेवमध्ये वसतिगृह, एक हजार महिलांसाठी राहण्याची व्यवस्था

मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईतील ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर म्हाडातर्फे एक हजार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारले जाणार आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घोषणा केली. 450 खोल्यांचे हे सुसज्ज वसतिगृह साधारणपणे दीड ते दोन वर्षांत उभारले जाणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली.

राज्यभरातून महिला येथे नोकरी करण्यासाठी येतात, मात्र त्यांना कार्यालयाजवळ राहणे शक्य होत नाही. कार्यालयापासून दूर उपनगरांमध्ये राहावे लागत असल्याने रोजच्या प्रवासामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ही गरज ओळखून ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊंड परिसरात हे वसतिगृह उभारणार आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू नववर्ष. या नववर्षाचे स्वागत मोठय़ा जल्लोषात आणि उत्साहात केले जाते. मुंबईत गिरगावसह ठिकठिकाणी भव्य शोभायात्रा काढल्या जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रांना मनाई करण्यात आली होती. मुंबईकरांनीही संयम दाखवून शांततेत पाडवा साजरा केला. गिरगावकरांनी शोभायात्रा काढली नाही, पण पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले.

आपली प्रतिक्रिया द्या