‘फास्टॅग’मुळे 70 लाख वाहनचालकांचे साडेतीन लाख तास वाचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फास्टॅग म्हणजे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन यंत्रणा होय. येत्या 1 डिसेंबरपासून नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या (एनएचएआय) 520 टोलनाक्यांवर फास्टॅग सुरू होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या सुमारे 70 लाख वाहनचालकांचे साडेतीन लाख तास वाचतील. याशिवाय प्रत्येक वर्षी  75 हजार कोटी रुपयांचे इंधन वाचेल आणि प्रदूषणात 20 टक्के घट होईल.

देशभरात एनएचएआयचे 537 टोलनाके आहेत. यातील 17 अद्याप सुरू नाहीत. अशा रीतीने 520 टोलनाक्यांवरील एक लेन सोडून बाकीवर फास्टॅग सुरू होईल. या लेनकरून फास्टॅग नसणारी वाहने अर्थात रोख रक्कम देणारी काहने जातील, मात्र एकच लेन असल्याने तेथे लांबच लांब रांगा लागेल हे निश्चित आहे.

टोल भरताना एका वाहनाला साधारणपणे चार मिनिटांचा वेळ लागतो. अशा रीतीने 4.66 लाख तास रोज टोलवर वाया जात आहेत. फास्टॅगनंतर हा केळ 25 टक्क्यांनी घटून सुमारे एक मिनिटावर येईल. 70 लाख वाहनांचे तीन-तीन मिनिटे वाचतील. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष एस. के. मित्तल यांनी सांगितले की, टोलवर होणारी वाहतूककोंडीमुळे दरवर्षी एक लाख कोटी रुपयांचे इंधन वाया जाते. फास्टॅगमुळे 25 टक्केच वेळ लागणार असल्याने हे नुकसान घटून 25 हजार कोटी रुपयांची बचत होईल. 30 नोव्हेंबरपर्यंत एनएचएआयद्वारे फास्टॅग मोफत उपलब्ध असून 150 रुपयांचा रिचार्ज करण्यात येत आहे. त्याशिवाय फास्टॅगद्वारे रक्कम दिल्यास 2.5 टक्के कॅशबॅक मिळेल. सध्या एका वर्षात 24.396 हजार कोटी टोलची वसुली होत आहे. टोलद्वारे वर्षभरात 30 हजार कोटी मिळवण्याचे लक्ष्य आहे.  

कोणत्या राज्यांत फास्टॅग

रस्ते वाहतूक मंत्रालयाचा काही राज्यांबरोबर करार झाला आहे. त्याअंतर्गत तेथील टोलनाक्यांवर 1 डिसेंबरपासून फास्टॅग सुरू होईल. यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. राजस्थान, गुजरात, हरियाणा, तामीळनाडू आणि पंजाबमध्ये लवकरच याची सुरुवात होईल.

  • देशात राष्ट्रीय महामार्गाची लांबी 1.40 किमी आहे.
  • सध्या 24 हजार 996 किमी महामार्गाकर होत आहे टोल वसुली.
  • आतापर्यंत 66,19,055 फास्टॅग वितरित झाले आहेत.
  • चारचाकी आणि बस-ट्रकसाठी वेगवेगळी फास्टॅग राहील.
  • फास्टॅग नसलेले वाहन फास्टॅग लेनमध्ये आल्यास दुप्पट टोल.