तांत्रिकासोबत सेक्ससाठी दिला नकार, पतीने केला पत्नीचा खून

219

सामना ऑनलाईन । आग्रा

अलीगडमध्ये आपल्या पत्नीचा खून केल्या प्रकरणी एका पतीला पोलिसांनी अटक केली आहे. एका भोंदू बाबाशी शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आपण पत्नीचा खून केल्याचे पतीने कबुल केले.

उत्तर प्रदेशमधील मनपाल सिंह हा पेशाने इंजीनीअर होता. त्याला झटपट श्रीमंत व्हायचे होते. यासाठी तो एका भोंदू बाबाच्या नादी लागला. बिहारमधील संतदास झारखंडी याने मनपालला श्रीमंत होण्याचा मार्ग सांगितला. त्यासाठी संतदासने मनपालच्या पत्नीशी सेक्स करण्याची मागणी केली. यासाथी मनपाल सिंहने आपली पत्नीवर त्यासाठी दबाव टाकला. जेव्हा तिने नकार दिल्या तेव्हा नराधम मनपालने तिला मारहाण केली. नंतर गंगेत बुडवून तिला मारून टाकले.

महिलेच्या भावाने पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मनपालला अटक केली. तेव्हा आपणच तिचा खून केल्याचे त्याने कबुल केले.