दुसऱ्या लग्नासाठी केली बायकोची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । दिल्ली

सध्याच्या काळात प्रेमप्रकरणं किंवा घरच्या वादातून आत्महत्या व खून करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशीच हृदयाचा थरकाप उडवणारी एक घटना दिल्लीत घडली आहे. दुसरं लग्न करण्याच्या नादापायी नवऱ्यानं बायकोचा खून करून तिचे सात तुकडे केले आणि जंगलात फेकून पळ काढला.

जूही असं मृत महिलेचं नाव आहे. तिचा पती साजिद अली अंसारी यानं बायकोला मारण्याकरता त्याच्या दोन भावंडांसमवेत कट रचला होता. त्याच्या एका भावानं जूहीच्या शरीराचे सात तुकडे केले होते. जूहीची ओळख पटू नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर चाकूनं वारही करण्यात आले होते. तर दुसऱ्या भावानं तुकडे केलेलं शरीर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून खोक्यात भरण्यास मदत केली होती. सरिता विहारच्या भागात राहणाऱ्या लोकांना या संशयास्पद खोका निदर्शनास येताच त्यांनी तेथील पोलिसांना कळवलं होतं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या बाबत तपास करण्यास सुरुवात केली. या खोक्यावर दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा छडा लावला होता.

दिल्लीच्या पोलिसांनी खोक्याच्या बाजूस दिलेल्या माहितीनूसार दिल्लीतीचं राहणाऱ्या जावेदला गाठलं. जावेदनं पोलिसांना चौकशीदरम्यानं खोका बिहारमध्ये राहणाऱ्या साजिद अली अंसारी व त्याचा भाऊ इश्तियाक आलम यांना भाड्यावर दिला असल्याचं सांगितलं. पोलिसांनी या आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसंच या आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल, असं ही पोलिसांनी सांगितलं आहे.