पतीने केला पत्नीवर बलात्कार, पोलिसात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । अंबड

पतीने बळजबरी करुन पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अंबड येथे समोर आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने अंबड पोलिसात पती संदीप जैस्वाल विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड शहरातील मोहन टॉकीजवळ राहणाऱ्या महिलेने तिचा पती संदीप जैस्वाल विरोधात कलम 498 अन्वये गुन्हा दाखल केला होता. तिची केस चालू असताना 11 ते 15 नोव्हेंबर 2018 रोजी फिर्यादी ही तिचा पती संदीप जैस्वालच्या घरी अंबड येथे आली असता तिला खोलीत डांबून शिवीगाळ, मारहाण करुन माझ्यावर विरोधात केलेली तक्रार मागे घे नसता तुला जिवे मारुन टाकीन अशी धमकी देऊन तिच्या मनाविरुध्द जबरी संभोग केला. या प्रकरणी अंबड पोलीसात पीडित महिलेने तक्रार दिली मात्र, गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे महिलेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरुन आरोपी पती संदिप जैस्वाल (32) विरुध्द कलम 376(अ), 313, 340, 342, 325, 323 कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोन्ने हे करीत आहेत.