
सामना ऑनलाई । नवी दिल्ली
मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना पक्षाने पुन्हा मथुरेहून तिकीट दिली आहे. त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आपण पुन्हा निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि मथुरेत आपण इतकी कामे केली आहेत की ते मला आठवतच नाही असेही हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.
सोमवारी हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्यासह बांके बिहारी मंदिरात विधीवत पुजा केली आणि त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकाराशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, “मी मथुरेत खूप कामे केली आहेत. म्हणूनच मला पुन्हा संधी मिळाली आहे. परंतु मी काय काय कामेकेली हे मला आठवत नाही. मला लोकांनी पसंत केले आणि मी नेहमीच त्यांच्या विकासासाठी काम करत राहीन. मग ती कामे रस्त्याची असो, रहिवासी जागांचा असो वा कुठलाही असो, मी नेहमीच जनतेच्या विकासासाठी काम केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या निवडणुकीत आपण पुन्हा निवडून येऊ असा विश्वासही त्यांने व्यक्त केला आहे.



























































