
आयफोनच्या किमती जास्त असल्या तरी त्याची फीचर्स आणि क्वालिटीसुद्धा एकदम खास असते. आयफोनला देशविदेशात का जास्त मागणी असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. एक आयफोन दहा महिने नदीत पडलेला होता. ज्यावेळी बाहेर काढले त्यावेळी तो एकदम ठाकठीक होता. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. नदीतील आयफोनची घटना इंग्लंडची आहे. ओवेन डेविस नावाच्या व्यक्तीने ‘ऍपल आयफोन एक्स’ पॅण्टच्या खिशात ठेवला होता. खोल पाण्यात पडल्यानंतर डेविसला फोन परत मिळण्याची शक्यता कमी वाटत होती. काही महिन्यांनंतर तो फोनला विसरलासुद्धा. त्यानंतर दहा महिन्यांनी मिगेल पचारो नावाच्या इसमाला फोन मिळाला. तो एकदम चांगल्या अवस्थेत होता.


























































