
सामना ऑनलाईन । जयपूर
पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, आपण राजकीय संन्यास घेणार नसल्याचे त्यांनी शनिवारी स्पष्ट केले. राजकीय संन्यास घेण्याचे वक्तव्य आपण किंवा आपल्यातर्फे कोणीही केले नसल्याचेही त्या म्हणाल्या. आपण प्रकृती अस्वास्थामुळे पुढील निवडणुका लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टरांनी आपल्याला धुळीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
डिसेंबर 2016 मध्ये किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी आपल्याला धूळीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपण प्रचारसभांना जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण जेव्हा सभांना जातो तेव्हा धूळीपासून लांब राहण्याचा प्रयत्न असतो. धूळीपासून दूर राहणे आपल्या प्रकृतीसाठी आवश्यक असणे महत्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. प्रकृतीच्या या कारणामुळे आपण पुढील निवडणुका लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आपण राजकीय संन्यास घेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता आपली प्रकृती चांगली असून डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करत असल्याचे त्या म्हणाल्या. प्रचारादरम्यान कितीही प्रयत्न केला तरी आपण धूळीपासून वाचू शकत नाही. धुळीमुळे संक्रमण होण्याचा धोका असल्याचे डॉक्टर म्हणाले आहेत. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
























































