अमरनाथ यात्रेकरूंना हवाई दल सोडणार सुरक्षित ठिकाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा मध्ये थांबवण्यात आली आहे. तसेच सर्व यात्रेकरूंना कश्मीर सोडण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत. यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी न्यावे अशी विनंती जम्मू कश्मीर सरकारने केंद्र सरकारकडे केली होती. ही विनंती केंद्र सरकारने मान्य करून हवाई दलाचे एक विमान त्यासाठी सज्ज झाले आहे.

C-17 हे हवाई दलाचे विमान यात्रेकरूंना घेऊन कश्मीर, पठाणकोट आणि दिल्लीत या सुरक्षित ठिकाणी थांबणार आहे. त्यानंतर यात्रेकरू आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचू शकतात.  या विमानाची क्षमता २३० प्रवाशांची आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रेकरूंनी लवकरात लवकर राज्य सोडावे अशी सूचना जम्मू कश्मीर सरकारनी दिली होती.  जैश ए मोहम्मद आणि इतर संघटनांचा दहशतवादी कारवायांचा धोका असल्याने ही यात्रा मध्येच रद्द करण्यात आली. दहशतवादी हल्ला होईल अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.