Women’s T20 World Cup – पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या पोरींचा विश्वविक्रम; श्रीलंकेचा 87 धावांनी धुव्वा उडवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ICC Women’s T20 World Cup 2026 चा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये खेळला गेला. या पहिल्याच सामन्यात इंग्लंडने आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करत श्रीलंकेचा 87 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडने दिलेल्या डोंगरा एवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची घसरगुंडी झाली आणि श्रीलंकेचा संपूर्ण संघ 132 धावांवर बाद झाला. इंग्लंडच्या फ्रेया केम्पने आपल्या पदार्पणातच नेत्रदिपक गोलंदाजी करत श्रीलंकेला मोठे हादरे दिले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने डॅनी वॉट हौजच्या 62 चेंडूंतील नाबाद 105 धावांच्या (13 चौकार, 1 षटकार) शतकीय खेळीच्या जोरावर 1 बाद 219 धावांचा डोंगर उभा केला. हा महिला टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. या धावसंख्येसह इंग्लंडने स्वतःचाच 2023 मधील पाकिस्तानविरुद्धचा 213 धावांचा रेकॉर्ड मोडला. या रंगतदार सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण 351 धावा केल्या. महिला टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एकाच सामन्यात दोन्ही संघांनी मिळून केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. या यादीत 2018 मधील हिंदुस्थान आणि न्यूझीलंडचा सामना अव्वल स्थानावर आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून एकूण 354 धावा चोपून काढल्या होत्या. श्रीलंका संघाने या सामन्यात आणखी केवळ 4 धावा केल्या असत्या, तर हिंदुस्थान-न्यूझीलंडचा हा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला असता, मात्र श्रीलंकेला 132 धावांवर रोखण्यात इंग्लंडला यश आले.

FIFA World Cup 2026 – 17 वर्षांच्या मोराचा नवा इतिहास

इंग्लंडची युवा गोलंदाज फ्रेया केम्प हिने आपल्या टी-20 वर्ल्ड कप पदार्पणाच्या सामन्यातच उत्कृष्ट कामगिरी करत 4 बळी घेतले. या कामगिरीसह ती वर्ल्ड कप पदार्पणात 4 विकेट्स घेणारी जगातील तिसरी आणि इंग्लंडची दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिच्यापूर्वी 2010 मध्ये इंग्लंडच्याच डॅनी वायटने हा पराक्रम केला होता. तसेच, हिंदुस्थानची डायना डेव्हिड ही देखील या विशेष क्लबमध्ये सामील आहे, जिने 2010 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपल्या पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या.