
17 वर्षीय गिल्बर्टो मोराने इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 65 व्या मिनिटाला मैदानात उतरत तो वर्ल्ड कपमध्ये मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात युवा फुटबॉलपटू ठरला. 17 वर्षे 240 दिवस वय असलेला मोरा विश्वचषकात खेळणारा सहावा सर्वात युवा खेळाडू बनला.
3 लाख चाहत्यांची गर्दी
कर्ल्ड कपनिमित्त टोरोंटो मध्ये तीन लाखांपेक्षा अधिक परदेशी चाहत्यांची गर्दी उसळणार आहे.
रेड कार्डची रेड
उद्घाटनीय सामन्यात रेड कार्डनेच विक्रमावर रेड मारली. मेक्सिको-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात तब्बल तीन खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आले, जो विश्वचषकाच्या उद्घाटन सामन्यातील नवा विक्रम ठरला. दक्षिण आफ्रिकेचे स्फेफेलो सिथोले आणि थेम्बा ज्वाने, तर मेक्सिकोचा सेझार मॉन्टेस यांना मैदानाबाहेर पाठवण्यात आले. सर्वाधिक चार रेड कार्डांचा विक्रम 2006 मधील पोर्तुगाल-नेदरलँड्स सामन्यात झाला होता.
कोरिया… कोरिया..
दक्षिण कोरियाने आपल्या पहिल्याच सामन्यात चेकियाचा पराभव केल्यामुळे कोरियन चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.




























































