
आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमी, लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन व इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंट यांच्यातर्फे अखिल हिंदुस्थानी ऑनलाईन मोफत प्रवेशाची बुद्धिबळ स्पर्धा 6 व 7 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने स्पर्धा सर्वांसाठी विनाशुल्क खुली असून विजेत्या-उपविजेत्यांसाठी एकूण 10 रोख पुरस्कार आहेत. स्विस लीग पद्धतीने नऊ फेऱयांमध्ये ही स्पर्धा ऑनलाईन लिचेस प्लॅटफॉर्मवर होईल.
लायन्स क्लबचे सेकंड व्हाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी नगरपाल पदाच्या कारकिर्दीत पहिली मुंबई शेरीफ चषक आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुद्धिबळ स्पर्धा आयडियल अॅकॅडमीच्या माध्यमातून यशस्वी केली होती. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा प्रत्यक्ष क्रीडा स्पर्धा होऊ शकत नसल्यामुळे ऑनलाईन मोफत बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली आहे. डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी सदर स्पर्धेमधील मुंबई शहर, उपनगर व ठाणे जिल्हय़ातील प्रत्येकी टॉप-10 बुद्धिबळपटूना विशेष 30 रोख पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱया खेळाडूंनी प्रवेशासाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सेव्रेटरी राजाबाबू गजंगी (9324719299 व्हॉट्सअॅपवर) यांच्याकडे 5 जूनपर्यंत संपर्क साधावा.




























































