इथं होळीच्या दिवशी रंग उधळल्यावर करावं लागतं लग्न!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळी हा हिंदुस्थानातील एक पारंपरिक सण. या सणाला रंगांचे महत्त्व असून एकमेकांना रंग लावून होळीचा आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे, मात्र देशात असे एक ठिकाण आहे तेथे होळीच्या दिवशी रंग उडवले जात नाहीत.

झारखंडमधील जमशेदपूर जिल्ह्यातील काही आदिवासी भागांत रंगांनी होळी खेळली जात नाही. अनेक वर्षांपासून ही पद्धत येथील आदिवसी लोकं पाळत आहेत.

खरं तर बऱ्याच ठिकाणी होळीच्या काही दिवस आधीपासूनच रंग उडवले जातात. पण जमशेदपूर जिल्ह्यात या दिवसांत रंग नजरेसच पडत नाहीत. रंगाऐवजी येथील लोकं एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून होळी खेळतात.

कारण येथील आदिवासी समाजात अशी प्रथा आहे की, एखाद्या तरुणाने किंवा तरुणाने होळी खेळताना अंगावर रंग उडवला की, लग्न करावे लागते. त्यामुळे येथील लोकं रंगांची होळी खेळत नाहीत.

येथे काही दिवस आधीपासूनच रंगपंचमी खेळायला सुरुवात होते. रात्रभर एकमेकांवर पाणी टाकून ढोल वाजवून पारंपरिक वेशभूषेत नृत्य करून होळी सण साजरा होतो, पण रंग उडवणे मात्र टाळले जाते.