
लोखंडी कढईत स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः शरीरात लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी, लोखंडी कढईचा वापर करणे गरजेचे असते. लोखंडी कढईत अन्न शिजवतो तेव्हा त्यात, थोडेसे लोह मिसळते. हे लोह आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. लोखंडी कढईच्या वापरामुळे आपल्याला अनेक आरोग्यवर्धक फायदे मिळतात.
गर्भधारणेदरम्यान आहारात काय समाविष्ट करायला हवे, जाणून घ्या.
निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीरात सर्व गोष्टी जाणे हे गरजेचे आहे. आपल्या आहारात लोहाचे प्रमाण कमी झाल्यास, खूप अशक्तपणा येतो. म्हणूनच आपल्या आहारात लोहाचे योग्य प्रमाण हे गरजेचे आहे. लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी केवळ अन्नपदार्थच उपयोगाचे नाहीत. तर लोखंडी भांड्यात स्वयंपाक केल्यानेही आपल्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण वाढते.
कोणत्या भाज्या लोखंडी भांड्यात शिजवायला हव्यात
वांगी- वांग्याचे भरीत लोखंडी कढईत बनवल्यास त्याची चव आणि पोषण अधिक वाढते.
बटाटा-मेथी / बटाटा-कांदा या सामान्य भाज्या आहेत, परंतु लोखंडी कढईत शिजवल्याने त्यामध्ये लोहाचे प्रमाण वाढते. यामुळे त्यांची चव अधिक वाढते.
पालक- पालक मूळातच लोहाने समृद्ध असतो. पालक लोखंडी कढईत शिजवल्यावर, त्यातील लोहाचे प्रमाण अधिक वाढते. विशेषतः मुलांसाठी आणि महिलांसाठी खूप फायदेशीर आहे.
सरसो का साग (मोहरीची भाजी) ही एक खास हिवाळ्यातील भाजी आहे आणि लोखंडी कढईत त्याची चव दुप्पट होते. त्यात आधीच लोह आणि कॅल्शियम असते, जे लोखंडी कढईत शिजवल्यावर अधिक चविष्ट होते.
मेथी / बथुआ / राजगिरा सारख्या हिरव्या पालेभाज्याया भाज्या लोह आणि फायबरने समृद्ध असतात. लोखंडी कढईत मंद आचेवर शिजवल्याने चव आणि पोषण दोन्ही वाढते.
लोखंडी भांड्यात अन्न शिजवण्याचे फायदे
अन्नातील लोहाचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढते.
कोणतेही रासायनिक कोटिंग नसल्यामुळे, पदार्थ चविष्ट बनतो.
शरीराला नैसर्गिकरित्या लोह मिळते.
लोखंडी कढईत कोणते पदार्थ करु नये
लोखंडी कढईत टोमॅटो, लिंबू किंवा चिंच यांसारखे आंबट पदार्थ जास्त वेळ शिजवू नका. आम्लयुक्त पदार्थांमुळे लोहाची जास्त प्रतिक्रिया होऊ शकते.
























































