
सामना ऑनलाईन। मुंबई
आयफा २०१८ च्या पुरस्काराकरता सर्व कलाकार व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलं होतं. तसंच कोणत्या कलाकाराला या आयफाच्या डॉलचं मानचिन्ह मिळेल याची उत्सुकता लागून राहिली होती. २४ जून रोजी बँककॉक येथे आयफाचा २०१८ चा पुरस्कार सोहळा पार पडला. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून इरफान खान याला हिंदी मीडियमसाठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटाकरता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं

आयफा २०१८च्या पुरस्कार सोहळ्याला दिग्गज कलाकार व प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. तसंच बॉलिवूडच्या कलाकारांनी या ग्रीन कार्पेटच्या मंचावर नृत्याच्या माध्यमातून तेथं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केलं.तसंच या सोहळ्यात अजूनही तरुणीची झलक दाखविणाऱ्या रेखाजींनी तब्बल २० वर्षानंतर आपल्या नृत्याच्या अदाकाराने सर्वांना मोहून टाकलं. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या सोहळ्यातील आयफाचं मानचिन्ह कोणाला मिळणार याकरता सर्वांची उत्सुकता लागली होती. अखेर प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला. पुरस्कारांकरता निवडलेल्या कलाकरांची नावं घोषित करण्यास ही सुरुवात झाली. त्यावेळी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे झाले होते. ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आयफाचा मान पटकवला आहे. तसंच दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटाकरता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आयफाच्या डॉलचं मान्हचिन्हानं देण्यात आलं आहे. श्रीदेवींच्या मानचिन्हानाचा स्विकार बोनी कपुर यांनी केला आहे. तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून इरफान खान याला हिंदी मीडियमसाठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
आयफाच्या २०१८च्या पुरस्कार सोहळ्यात या दोन दिग्गज कलाकारांसोबत बेस्ट सपोर्टिंग कलाकार म्हणून मेजर हिज व नवाजुद्दिन सिद्दिकी यांना आयफा २०१८चा पुस्कार प्रदान करण्यात आला आहे.


























































