
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील विविध ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर छापा टाकून 22 दिवसात कोपरगाव महसूल पथकाने धडक कारवाई करीत 15 वाहनासह 80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले गेल्या 22 फेब्रुवारी पासून ते 15 मार्च पर्यंत कोपरगाव तालुक्यातील मौजे डाऊच बुद्रुक, माहेगाव देशमुख, वारी, मायगाव देवी, जेऊर पाटोदा व डाऊच खुर्द येथील नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर छापे टाकून 10 ट्रॅक्टर 3 डंपर 2 जेसीपी, अशी एकूण पंधरा वाहने जप्त करण्यात आली असून या जप्त केलेल्या वाहनासह मुद्देमालाची अंदाजीत किंमत 80 लाख रुपये आहे.
तर या कारवाईत 3 अज्ञात इसमांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कारवाई करण्यात आलेल्यांची मालकांची नावे व वाहनांची माहिती पुढीलप्रमाणे, अल्ताफ अब्दुल बागवान कोपरगाव विना नंबरचा ट्रॅक्टर, अज्ञात इसम विना नंबरचा ट्रॅक्टर ,रामकृष्ण शिवराम कदम रवंदे ट्रॅक्टर नंबर एम.एच. 17 720, रवींद्र उत्तम पानगव्हाणे माहेगाव देशमुख बिगर नंबर ट्रॅक्टर, बाबासाहेब शिवाजी बढे डाऊच खुर्द, विना नंबर ट्रॅक्टर, चंद्रकांत बाजीराव गुरसळ डाऊच खुर्द ट्रॅक्टर नंबर एमएच-17 येई 66 79, सचिन दादा कुलथे सटाणा जेसीपी बिना नंबर, प्रशांत कोते शिर्डी डंपर एम. एच.04 27 75, सुनिल अशोक जाधव सांगवी भुसार ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. 17 एव्ही. 67 40, अशोक काशिनाथ सोनवणे सुरेगाव डंपर क्रमांक mh15 डिके 67 77, अशोक काशिनाथ सोनवणे सुरेगाव डंपर एम. एच. 12 327 ,अज्ञात इसम जेसीपी क्रमांक mh15 एयू. 592, योगेश गरूळ जेऊर पाटोदा महिंद्र ट्रॅक्टर लाल रंग बिना नंबर, स्वप्निल दिलीप मंजुळ कोपरगाव स्वराज 744 निळा रंग विना नंबर, अज्ञात इसम स्वराज निळा रंग विना नंबर, ही सर्व मुद्देमालासह जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात सर्व कारवाई करून लावण्यात आली आहे. असे त्यांनी सांगितले.
ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, अप्पर जिल्हाधिकारी पण. एल. सोरमारे, उपविभागीय अधिकारी शिर्डी गोविंद शिंदे, यांच्या सूचनेनुसार करण्यात आली, असून या कामी तलाठी संवर्ग व ग्रामीण व शहर पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे, व राकेश माणगावकर तसेच तलाठी, मंडलाधिकारी व कार्यालयीन कर्मचारी, शासकीय वाहन चालक, या सर्वांच्या टीमवर्कमुळे शक्य झाल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.


























































