हँडपंपमधून बाहेर आली दारू, जमीनीखाली होता शेकडो लिटर साठा

liquor-madhya-pradesh

मध्य प्रदेशातील दतियामध्ये एक अजब घटना समोर आली आहे. पाण्याची तहान भागवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या हँडपंपमधून अवैध दारू बाहेर काढण्यात आली आहे. यामुळे अबकारी विभागाला मोठे यश मिळाले आहे.

कंजर डेरा नावाच्या एका गावात अवैध दारू बनवून विकली जाते अशी माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. या गावात त्यांनी धाड टाकली, पण दारू कुठे लपवली आहे हे कळेना. बराच वेळानंतर त्यांना एका ठिकाणी जमीन खोदून पुन्हा सारखी केल्यासारखे दिसले. पोलिसांच्या मदतीने त्यांनी त्या जागी खोदण्यास सुरुवात केली तेव्हा मोठ्या प्रमाणात अवैध दारू तिथे लपवल्याचे त्यांना लक्षात आले. ही दारू बाहेर काढण्यासाठी त्यांनी हँडपंपचा वापर केला.

ही दारू बाहेर काढून जागच्या जागीच नष्ट करण्यात आल्याचे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे. अवैध दारू प्रकरणात पोलिसांनी 6 जणांच्याविरोधात अबकारी कायद्यांतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावेळी अबकारी विभागाच्या अधिकारी निधि जैन यांनी गावातील मुलांची भेट घेतली आणि अवैध व्यवसाय सोडून शिक्षणाकडे लक्ष द्या असा सल्लाही दिला.

आपली प्रतिक्रिया द्या