
महिनाभर दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा राज्याच्या विविध भागांमध्ये कोसळण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्रांचे उपसंचालक के.एस. होशाळीकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
येत्या 1-2 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे .अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंन्द्र, मुंबई संकेत स्थळाला भेट ध्या .
Possibilities of heavy rainfall in state during next 24/48 hrs as per IMD forecast today.
For further details please visit IMD site.@RMC_Mumbai pic.twitter.com/qzKxgpN5nn— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 17, 2021
मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवरही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नगर, जालना, बीड, अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असाही अंदाज आहे. मुंबईत सोमवारपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. सांताक्रुझ वेधशाळेत 1.8 मि.मी तर कुलाबा वेधशाळेत 18.4 मि.मी. पावसाची नोंद झाली.





























































