LOKSABHA 2019 : लातूर शहरात आचारसंहीता भंगाचा पहिला गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना आचार संहितेचा भंग केल्यामुळे लातूर शहरामध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी य़शवंतराव चव्हाण कॉम्पलेक्समधील दोघां पती – पत्नीस अटक केली.

उध्दव भिकाजी देशपाडे व अर्चना देशपांडे यांचे यशवंतराव चव्हाण कॉम्पलेक्स येथे प्रचिती कॉम्प्युटर्स फर्म आहे. सदरील फॅर्मच्या फलकावर फॅर्मच्या नावासोबत राजकीय नेत्याचा फोटो आचारसंहिता लागू असतानाही तसाच ठेवल्यामुळे महानगर पालिकेचे क्षेत्रिय अधिकारी संजय कुलकर्णी यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरून पोलिसांनी उध्दव देशपांडे व अर्चना देशपांडे या पती पत्नींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सकाळी 10:30 वाजता उध्दव देशंपाडे व अर्चना देशंपाडे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.