
लीडस् कसोटीच्या पहिल्या डावात 78 धावांमध्ये गारद झालेला हिंदुस्थानी संघ ओव्हल येथील चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावातही अपयशी ठरला. ख्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन, जेम्स अॅण्डरसन व व्रेग ओव्हर्टन यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर हिंदुस्थानच्या रथी-महारथी फलंदाजांची डाळ शिजली नाही. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी साकारली. पण या कसोटीत पुनरागमन करणाऱया मुंबईकर शार्दुल ठापूरने अवघ्या 36 चेंडूंत तीन सणसणीत षटकार व सात दमदार चौकारांसह 57 धावांची खेळी साकारली. त्यामुळेच हिंदुस्थानला समाधानकारक 191 धावसंख्या उभारता आली. ख्रिस वोक्सने 4, ओली रॉबिन्सनने 3, जेम्स अॅण्डरसन व व्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
रहाणे, पंतच्याआधी जाडेजा फलंदाजीला आला
चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे याने फलंदाजीला येणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. रवींद्र जाडेजा खेळपट्टीवर फलंदाजीला आला. टीम इंडियाच्या व्यवस्थापनाचा हा निर्णय पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी ‘रेडी’ नसेल असे समालोचकांकडून सांगण्यात आले. मात्र संघ व्यवस्थापनाने रिषभ पंतवरही विश्वास दाखवला नाही. ढगाळ वातावरणात रिषभ पंतपेक्षा रवींद्र जाडेजा खेळपट्टीवर ठाण मांडेल असे त्यांना वाटले असावे. ख्रिस वोक्सने रवींद्र जाडेजाला 10 धावांवर बाद करीत हिंदुस्थानला चौथा धक्का दिला.
उपाहारापर्यंत यजमानांचे वर्चस्व
इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंपून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जेम्स अॅण्डरसन, ख्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन या वेगवान त्रिपुटाने पहिल्या सत्रात प्रभावी गोलंदाजी करीत कर्णधाराचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सार्थ ठरवला. ख्रिस वोक्सच्या उसळत्या अन् बाहेर जाणाऱया चेंडूवर रोहित शर्मा 11 धावांवर यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद झाला. त्यानंतर ओली रॉबिन्सनने लोकेश राहुलला 17 धावांवर पायचीत केले. यावेळी लोकेश राहुलने तिसऱया पंचांकडे मागणी केली, पण चेंडू स्टम्पला लागत असल्यामुळे मैदानातील पंचांचा निर्णय कायम ठेवण्यात आला. चेतेश्वर पुजाराने मागील कसोटीतील अखेरच्या डावात अर्धशतकी खेळी केली असली तरी इंग्लंड दौऱयात त्याचे चाचपडत खेळणे या डावातही सुरूच राहिले. जेम्स अॅण्डरसनच्या उत्पृष्ट स्विंग गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी 4 धावांवरच झेलबाद झाला. हिंदुस्थानची उपाहाराला अवस्था होती 3 बाद 54 धावा.
वेगवान 23 हजार धावा
विराट कोहलीने या डावात 50 धावा फटकावत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. सर्वात कमी म्हणजे 490 डावांत 23 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो फलंदाज ठरला. याआधी सचिन तेंडुलकरने 522 डावांमध्ये 23 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला होता.
रहाणे पुन्हा अपयशी
विराट कोहलीला मागील दोन वर्षांमध्ये शतकापासून दूर रहावे लागले आहे. या मालिकेतही त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने आठ चौकारांसह 50 धावांची खेळी साकारली. या डावात मोठी खेळी करील असे वाटत असतानाच ओली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर विराट कोहली यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद झाला. उपकर्णधार अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. व्रेग ओव्हर्टनने त्याला 14 धावांवर स्लिपमध्ये उभ्या मोईन अलीकरवी झेलबाद केले.
उभय संघांत प्रत्येकी दोन बदल
चौथ्या कसोटीसाठी दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी दोन बदल करण्यात आले. जोस बटलर व सॅम करण या दोघांऐवजी इंग्लंडच्या संघात ख्रिस वोक्स व ओली पोपची निवड करण्यात आली. हिंदुस्थानच्या संघात शार्दुल ठापूर व उमेश यादवचे पुनरागमन करण्यात आहे. इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांना बाहेर ठेवण्यात आले. रविचंद्रन अश्विनला याही कसोटीत संधी देण्यात आली नाही.




























































