
पूर्व लडाखमध्ये हिंदुस्थान-चीनमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेला संबोधित करताना परिस्थितीची माहिती दिली. दोन्ही देशात शांततेसाठी अनेक करार झाले असून चीन औपचारिक सीमेला मानत नाही. सीमेवर चीन सातत्याने व्यत्यय आणत असून त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
गलवान खोऱ्यात हिंदुस्थानच्या वीर जवानांनी चीनचे मोठे नुकसान केले असून सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर तयार आहे. चीनने सीमेवर भडकावू कारवाई केल्यास हिंदुस्थान त्याला उत्तर देण्यास सक्षम आहे. सीमेवर आपले जवान भक्कमपणे पाय रोवून उभे देशाचे शीर कधीही झुकू देणार नाही, अशी सिंहगर्जना राजनाथ सिंह यांनी केली.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, हिंदुस्थानकडून कोणत्याही प्रकारची सैन्य कारवाई झाली नसून चीनने एलएसीवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र हिंदुस्थानच्या लष्कराने त्यांचा मनसुबा उधळून लावला. तसेच हा मुद्दा शांततेने सोडवला जवळ अशी आमची इच्छा असून चीननेही यासाठी प्रयत्न करावे आणि हिंदुस्थानसोबत मिळून काम करावे. मात्र चीनने 1993 आणि 1996 च्या कराराचे उल्लंघन केले आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
While our armed forces abide scrupulously by it, this has not been reciprocated by the Chinese side: Defence Minister Rajnath Singh in Rajya Sabha on India & China border issue https://t.co/ba0c9btOrb
— ANI (@ANI) September 17, 2020
शीर झुकू देणार नाही
राजनाथ सिंह यांनी 130 कोटी लोकांना भरोसा देत देशाचे शीर झुकू देणार नाही असे म्हटले. तसेच जवानांचा जोश हाय असून कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी जवान तयार आहेत. सीमेवरील परिस्थिती पाहता जवानांना थंडीच्या दिवसातील कपडे, विशेष टेंट आणि आवश्यक हत्यार पुरवण्यात आले आहेत, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
























































