
कोरोनाची दुसरी लाट आली आहे. काही देशांमध्ये तर तिसऱया लाटेनेही प्रवेश केला आहे. अवघ्या जगाची कोरोना काळातील तक्रार एकच आहे. झोपेचे खोबरे झाले आहे! 13 देशांमध्ये शांत झोपेशी संबंधित सर्व्हेक्षण करण्यात आले तेव्हा 37 टक्के लोकांनी त्यांना निद्रानाशाचा विकार जडल्याचे मान्य केले. गंभीर बाब म्हणजे महिलांसह तब्बल 70 टक्के तरुणाईने झोपेच्या तक्रारी केल्या आहेत.
जगातील निद्रातज्ञांनी कोरोनातील निद्रानाश covid somniya असे नामकरण केले आहे. अमेरिकन अकादमी ऑफ न्युरोलोजीच्या म्हणण्यानुसार यामागे मानसशास्त्राrय कारणे आहेत. विशेषतः कोरोनाची भीती, आपल्या आप्त स्वकीयांची चिंता. ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. विजय बोधले यांनी सांगितलेली कारणे व उपाय…
- अनिद्रेची कारणे – कोरोनामुळे ताण तणाव वाढताना दिसत आहे. याचा मुख्य परिणाम आपल्या झोपेवर होतो आहे.
- लक्षणे – झोप न येणे किंवा वारंवार जाग येणे. सकाळी कामाच्या वेळेस थकल्यासारखे वाटणे, तेव्हा झोप येणे. उशिरा झोपूनही सकाळी लवकर जाग येणे. ही सारी लक्षणे कोरोना निद्रानाशाची आहेत.
- उपाय – दुपारी 2च्या नंतर चहा कॉफी घेण्याचे प्रमाण कमी करावे. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही यांचा वापर टाळावा. शयनगृहाचे तापमानही 16 ते 19 अंशामध्ये संतुलित असले तर शांत झोप लागते.
आरोग्यावर विपरीत परिणाम – हृदयविकाराचा धोका. झोप पूर्ण न झाल्याने रक्त दाब सतत वाढलेला राहतो. उच्च रक्तदाब ही हृदय विकारासाठी धोक्याची घंटा आहे. भूक जास्त लागते. शिवाय सततच्या निद्रानाशामुळे ताण तणाव वाढतात. हे मधुमेहाचे मुख्य कारण आहे.


























































