कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीने गाठला 63 लाखांचा टप्पा, 85 हजार 274 जणांनी कोरोनावर केली मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोनाचा संसर्गातही दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 63 लाखांवर पोहचली आहे. बुधवारी गेल्या चोवीस तासात 86 हजार 748 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यातील दिलासादायक बाब म्हणजे जवळपास 85 हजार 274 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1179 जणांनी आपला जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 7.5 कोटी नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरदिवशी कमंीत कमी 10 ते 11 लाख चाचण्या करण्यात येत आहे. त्यामुळे मध्यंतरी हा आकडा 15 लाखांंच्या आसपास पोहचला होता. पण इतर देशांमधील चाचण्या आपल्यापेक्षा सातपट पुढे आहेत.

दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये चाचण्यांच्या आकडेवारीने 1 कोटीचा टप्पा पार केला आहे. तर 87 लाख चाचण्या करून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. देशात जिथे प्रत्येक 10 लाख लोकसंख्येवर 53 हजार 634 चाचण्या केल्या जातात. त्याचवेळेला ब्रिटनमध्ये एवढ्याच लोकसंख्येवर 3 लाख 60 हजार 527, अमेरिकेत 3 लाख 24 हजार 403 लोकांच्या तपासण्या करण्यात येत आहे.