
देशात गेल्या 24 तासातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने तब्बल दोन लाखांचा आकडा पार केला आहे. देशभरात 2,00,739 कोरोनाग्रस्त आढळून आले असून 1038 जणांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानात एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे.
India reports 2,00,739 new #COVID19 cases, 93,528 discharges and 1,038 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,40,74,564
Total recoveries: 1,24,29,564
Active cases: 14,71,877
Death toll: 1,73,123Total vaccination: 11,44,93,238 pic.twitter.com/B5quloIUjH
— ANI (@ANI) April 15, 2021
देशात गेल्या दहा दिवसातच कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ही एक लाखावरून दोन लाखांवर पोहोचली आहे. तसेच मृतांचा आकडा देखील वाढत आहे. त्यामुळे हा वाढता आकडा देशासाठी चिंतेची बाब ठरला आहे. देशात आतापर्यंत 1,40,74,564 जणांना कोरोना होऊन गेलेला आहे. त्यातील 1,14,29,564 जण कोरोनामुक्त झाले असून 1,73,123 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 14,71,877 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत 11,44,93,238 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.
हरिद्वारमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला; एक हजार जणांना कोरोनाची लागण
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेला कुंभमेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर बनण्याची दाट शक्यता असून, 48 तासांत येथे एक हजार जणांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, बुधवारी शाही स्नानासाठी दुपारपर्यंतच दहा लाख भाविकांनी गर्दी केली होती. देशभरात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा उद्रेक झाला असतानाच हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन येथे होताना दिसत नाही. गंगा स्नानासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळत आहे.
महाराष्ट्रात संचारबंदी
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आजपासून 144 कलम लागू झाले असून पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. योग्य कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. राज्यात नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
गुजरातमध्ये अंत्यसंस्कारांसाठी रांगा
कोरोनाचा प्रकोप देशभरात वाढत असून गुजरातमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गुजरातमधील सूरतची अवस्था बिकट झाली आहे. मृतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात रांगा लागल्या असून कब्रस्थानातही तशीच परिस्थिती आहे. सूरतमधील कोरोनाचा प्रकोप आणि मृतांची वाढती संख्या लक्षात घेता कब्रस्थानमध्ये अॅडव्हान्समध्ये म्हणजेच आधीपासूनच कबर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.



























































