
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मेलबर्नच्या मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात बळींचा षटकार लगावला. बुमराहच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांत गुंढाळला आणि पहिल्या डावात 292 धावांची मोठी आणि महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.
#AUSvIND : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, हिंदुस्थानची खराब फलंदाजी
बुमराहने शुक्रवारी आपल्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. मेलबर्न कसोटीत बुमराहने फक्त 33 धावा देत कांगारुंच्या 6 फलंदाजांना पवेलियनचा रास्ता दाखवला. विशेष म्हणजे कारकीर्दीतील फक्त नववा सामना खेळणाऱ्या बुमराहने कसोटीच्या एका डावात 5 किंवा त्या पेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी आतापर्यंत तीन वेळा केली आहे. त्याच्या या प्रदर्शनामुळे सोशल मीडियावर देशी आणि विदेशी खेळाडूंनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Six wickets for Jasprit Bumrah. Australia 151. India will walk out to bat with a lead of 292 runs #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/z1pST3m7q5
— BCCI (@BCCI) December 28, 2018
यजमान ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच घरात पाणी पाजणाऱ्या बुमराहची प्रशंसा करताना हिंदुस्थानचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग म्हणाला की, ‘बुमराहने यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी कामगिरी केली आणि त्याने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवली आहे.’ विरुसह आणखी काही खेळाडूंनी बुमराहची प्रशंसा केली आहे.
Horrible decision… कांगारुंना फॉलोऑन न दिल्याने नेटिझन्सकडून विराटची धुलाई
‘हिंदुस्थानने दाखवून दिले की ते कसोटी क्रिकेटमध्ये नंबर एक का आहेत. या संपूर्ण मालिकेत बुमराहने आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवली आहे. मेलबर्नमध्ये 33 धावांत 6 बळी घेणाऱ्या बुमराहचे अभिनंदन.’
– मिशेल जॉन्सन, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज
‘बुमराहची गोलंदाजी ही 360 अंशात खेळ करणाऱ्या फलंदाजासारखी आहे.’
– संजय मांजरेकर, हिंदुस्थानचे माजी खेळाडू
‘मेलबर्नच्या मैदानावरील खेळपट्टीवर हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपेक्षा जास्त मदत मिळाली आणि बुमराहने यात सर्वोच्च कामगिरी केली.’
– आकाश चोप्रा, हिंदुस्थानचा माजी सलामीवीर
‘कदाचित माझ्या वक्तव्यावरून वादही होऊ शकतो परंतु सध्या बुमराह क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे.’
– दीपदास गुप्ता, हिंदुस्थानचा माजी खेळाडू


























































