
कोरोनापासून बचाव करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरअखेरपर्यंत हिंदुस्थानने कोरोनाचे तब्बल दहा कोटी डोस वाया घालवले आहेत. यात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींचा समावेश आहे. एका लसीची किंमत 225 रुपये गृहीत धरली तर व्यर्थ गेलेल्या लसींचे मूल्य तब्बल 2,250 कोटी रुपये इतके आहे.


























































