
पॅरालिम्पिकच्या इतिहासामध्ये हिंदुस्थानने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केली. हिंदुस्थानच्या चमूने काही दिवसांपूर्वीच टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णासह 7 पदके जिंपून ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतही हिंदुस्थानने 13 दिवसांत 5 सुवर्णांसह 8 रौप्य व 6 कास्य अशी एपूण 19 पदकांची कमाई करीत इतिहास घडविला. मागील 53 वर्षांत झालेल्या 11 पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानने एपूण 12 पदके जिंकली होती. मात्र यावेळी एकाच स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी तब्बल 19 पदके जिंकली.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानने 19 पदकांसह 2016च्या रियो पॅरालिम्पिकमधील स्वतःचा 4 पदकांचा विक्रम मोडला आहे. टोकियो पॅरालिम्पिकपूर्वी हिंदुस्थानकडे एपूण 12 पदके होती. आता ही पदकसंख्या 31 वर पोहोचली आहे. या स्पर्धेत 9 विविध क्रीडा स्पर्धांमध्ये हिंदुस्थानचे 54 पॅराअॅथलीट सहभागी झाले होते.
टोकियो पॅरालिम्पिक पदकतालिका
(टॉप-10 आणि हिंदुस्थान)
क्र. देश सु रौ का एपूण
1) चीन 96 60 51 207
2) ब्रिटन 41 38 45 124
3) अमेरिका 37 36 31 104
4) रशिया 36 33 49 118
5) नेदरलॅण्ड 25 17 17 59
6) युव्रेन 24 47 27 98
7) ब्राझील 22 20 30 72
8) ऑस्ट्रेलिया 21 29 30 80
9) इटली 14 29 26 69
10) अझरबेजान 14 01 04 19
24) हिंदुस्थान 05 08 06 19




























































