हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार; हिंदुस्थानात 31 मार्चला येणार आणखी तीन राफेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rafel-deal

पाकिस्तान आणि चीनशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी हवाई दलाचे सामर्थ्य आणखी वाढणार आहे. 31 मार्चला आणिखी तीन राफेल विमाने अंबालाच्या हवाई तळावर दाखल होणार आहेत. तसेच एप्रिलच्या मध्यापर्यंत आणखी 9 विमाने फ्रान्सहून हिंदुस्थानात येण्याची शक्यता आहे. ही विमाने आल्यावर हवाई दलात 21 राफेल असतील. त्यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.

राफेल विमाने हिंदुस्थानात आणण्यासाठी हवाई दलाची एक तुकडी फ्रान्सला गेली आहे. 31 मार्चपर्यंत ही विमाने अंबालाच्या हवाई तळावर दाखल होणार आहेत. तर विमानाची पुढची खेप एप्रिलच्या मध्यापर्यंत हिंदुस्थानात दाखल होणार आहे. त्यातील पाच विमाने उत्तर बंगालच्या हाशिमारा हवाई तळावर तैनात करण्यात येणार आहेत.

हिंदुस्थान सरकारने सप्टेंबर 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार 59 हजार कोटींमध्ये फ्रान्सशी केला होता. फ्रान्सची कंपनी दसॉ एव्हिएशनकडून पाच विमानांचा पहला जथ्या 28 जुलैला हिंदुस्थानात दाखल झाला होता. जुलै 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत 11 राफेल हवाई दलात दाखल झाले आहेत. ते लडाखच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. आता राफलच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे.