हिंदुस्थानी तिरंदाजांना कोरोनाची दुसरी लस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या हिंदुस्थानी तिरंदाजांना कोविड-19 ची दुसरी लस देण्यात आली. पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमध्ये (एएसआय) सराव करत असलेले आठ तिरंदाज, त्यांचे प्रशिक्षक व सहयोगी स्टाफ यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यास आला. अतनु दास, तरुणदीप राय, प्रवीण जाधव व बी. धीरज या पुरुष तिरंदाजांसह दीपिका कुमारी, अंकिता भगत, कोमोलिका बारी व मधू वेदवान या महिला तिरंदाजांना कोरोनाची दुसरी लस मिळाली. अतनुने आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर लसीकरणाचा फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. या सर्व तिरंदाजांनी ‘एएसआय’चे आभार मानले. हिंदुस्थानचा तिरंदाजी संघ 19 एप्रिलला गुआटेमाला सिटीमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या चरणासाठी तयारी करत आहेत.