
हिंदुस्थानी हवाई दलाचे लढाऊ विमान मिग 29 उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कोसळल्याची घटना सोमवारी घडली. हे विमान सरावासाठी जात होते त्या वेळी ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. विमानाने आकाशातच पेट घेतला. आग वाढल्यानंतर विमान शेतात कोसळले. त्याच वेळी पायलट आणि आणखी एका व्यक्तीने विमानातून उडी मारून जीव वाचवला. जमिनीवर कोसळताच संपूर्ण विमान आगीत भस्मसात झाले. दरम्यान, हवाई दलाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.





























































