हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचा गाभा बळकट – पंतप्रधान मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचा गाभा बळकट आहे. सरकारची धोरणेही सुस्पष्ट आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या जागतिक व्यापार परिषदेत बोलताना केला. 2019 मध्ये हिंदुस्थानात 48 अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक झाली. ही वाढ आधीच्या वर्षीपेक्षा 16 टक्क्यांनी अधिक आहे. खासगी गुंतकणुकीतही 53 टक्के वाढ होऊन ती 19 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, असेही मोदी म्हणाले. कलम 370 हटवणे, सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीकरून केंद्र सरकारवर टीका करणार्‍यांना पंतप्रधानांनी या वेळी उत्तर दिले. टीकाकार नेहमी योग्य करण्याच्या मार्गावरून चालणार्‍यांचा द्वेष करतात, असे त्यांनी सुनावले.