गांधी कुटुंबाच्या ‘विशेष’ सुट्टीच्या बातम्या वाचून तुम्हालाही धक्का बसेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो सौजन्य- इंडिया टुडे

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी लक्षद्वीप इथल्या एका बेटावर आयोजित केलेल्या पार्टीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांमध्ये उल्लेख केला आहे. या पार्टीबद्दलचे सविस्तर वृत्तांत 1988 साली प्रसिद्ध करण्यात आले होते. या बातम्यांमध्ये पार्टी कशी झाली, त्यासाठी कशी तयारी करण्यात आली. कसं हे बेट पार्टीसाठी निर्मनुष्य ठेवण्यात आलं याबाबतच्या सविस्तर बातम्या त्याकाळी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या जुन्या बातम्यांना इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटवर पुन्हा उजाळा देण्यात आला आहे. या बातम्यांमधील तपशील खालीलप्रमाणे आहे.

बातमीची तारीख-16 डिसेंबर 1987

राजीव गांधी यांनी त्यांच्या सासरच्या मंडळी आणि मित्रमैत्रिणींसोबत गेल्यावर्षी (1986 साली) अंदमान इथे नववर्ष स्वागत केलं होतं. यावर्षी(1987) साली ते लक्षद्वीप इथल्या बेटांवर ते नववर्ष स्वागत करणार आहेत.  बेटावर तात्पुरती घरे उभारण्यात येणार असून यासाठी कंत्राटदार, काँग्रेस कार्यकर्ते, सुरक्षा रक्षक यांना कामाला जुंपण्यात आले आहे. पाणीदेखील हिंदुस्थानातून आणण्यात येणार आहे. पंतप्रधान ख्रिसमस नंतरचा संपूर्ण आठवडा इथे घालवणार आहेत. यासाठी नारळ आणि मासे सोडून बाकी सगळ्या गोष्टी हिंदुस्थानातून आणण्यात आल्या आहेत.

राजीव गांधी यांच्यावरील ‘तो’ आरोप नौदल अधिकाऱ्यांना अमान्य

 

बातमीची तारीख- 28 डिसेंबर 1987

मुख्य भूभागापासून लक्षद्वीप बेटावर कोणालाही येण्यास मनाई करण्यात आली आहे. या द्वीपसमूहातील एका बेटावर पंतप्रधान सुट्टीसाठी येणार आहेत. ज्याकोणाला बेटांवर जायचे असेल त्याला पंतप्रधानांची सुट्टी संपेपर्यंत वाट पाहावी लागेल. ये बेटांवर जाणाऱ्या बोटींच्या तिकीटाची विक्री 15 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. याबाबतचे कारण विचारले असता अधिकाऱ्यांनी सांगितले की सगळ्या सीट आधीच बुक करण्यात झाल्या आहेत आणि काही सीट या पंतप्रधानांच्या सुट्टीसाठी येणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सुट्टीसाठी 4 महिने आधीपासून तयारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राजीव गांधींनी सहलीसाठी कसा केला INS विराटचा वापर? वाचा सविस्तर

 

बातमीची तारीख- 29 डिसेंबर 1987

लक्षद्वीप प्रशासनाला पंतप्रधान, मंत्री यांचा संपूर्ण कुटुंबकबिला पाहून आश्चर्याचा धक्का बसला. केरळमध्ये प्रसिद्ध असलेला गोड पदार्थ लक्षद्वीप येथे विमानाने आणण्यात आला असून तो पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी देण्यात येणार आहे.

बातमीची तारीख- 30 डिसेंबर 1987

पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सुट्टीसाठी बंगाराम बेटाची निवड करण्यात आली आहे. या बेटावर दारू पिण्याची परवानगी आहे. या द्वीपसमूहातील हे एकमेव बेट असे आहे जिथे दारू पिण्याची परवानगी आहे. या बेटसमूहातील बहुतांश बेटे ही मुस्लिमबहुल असल्याने तिथे दारू पिण्यास मनाई आहे. जर लक्षद्वीपला येणाऱ्या पर्यटकांना दारू प्यायची असेल तर ती बोटीमध्येच पिता येते. असं सांगण्यात येत आहे की एका बोटीवर नववर्ष स्वागताची पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या पार्टीसाठी निवडक दारूचे ब्रँड आधीच बेटावर पोहोचवण्यात आले आहेत. चिकन,मटण आणि ताज्या भाज्या आरोग्य निरीक्षकांनी केलेल्या तपासणीनंतर कोचीनवरून हवाईमार्गे बेटावर पोहोचवण्यात आल्या आहेत.

बातमीची तारीख- 24 जानेवारी 1988

पंतप्रधानांच्या नववर्षस्वागतासाठी 8 विदेशी पाहुणेही त्यांना सामील झाले होते. स्वागतासाठी आलेली मंडळी एकूण 24 जण असून त्यात महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्या दिमतीसाठी 70 माणसांचा ताफा तैनात होते. लक्षद्वीप पोलीस आणि मध्य प्रदेशाच्या सशस्त्र दलाचे पोलीस दलाचे मिळून 1200 जण बंगाराम बेटाशेजारच्या आगात्ती बेटावर तैनात करण्यात आले होते. या बेटावर नौदलाद्वारे बारीक नजर ठेवली जात होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बेटावर आयएनएस विराट, आयएनएस विंध्यगिरी, आयएनएस तारागिरी आयएनएस मगर या बोटींद्वारे बेटाभोवती नजर ठेवली जात होती.   याशिवाय लक्षद्वीप समूह प्रशासनाच्या तेलवाहू नौका आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीही दिमतीला ठेवण्यात आल्या होत्या.

पंतप्रधान आणि त्यांची पाहुणे मंडळी समुद्रात पोहण्यासाठी,बोटींगसाठी आणि ट्युना मासे पकडण्यासाठी गेली होती. बेटावर कबड्डी सामनेही ठेवण्यात आले होते. पंतप्रधानांचे खासगी सचिव व्ही.जॉर्ज यांच्याव्यतिरिक्त मणिशंकर अय्यर, सरला ग्रेवाल, एम.एम.जेकब हे या पार्टीदरम्यान आयएनएस विराटवर होते.