
बीसीसीआयने 2024 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाची तारीख जाहीर करत क्रिकेटप्रेमींसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. आगामी आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे संपन्न होण्याची शक्यता असून बीसीसीआयने फ्रेंचायजींना रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जमा करण्यास सांगितले आहे.
सध्या हिंदुस्थानात सुरू असलेल्या विश्वचषकामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये जल्लोषाचे वातावरण असतानाच बीसीसीआयने आगामी आयपीएलच्या लिलावाची तारीख जाहीर करून क्रिकेटप्रेमींच्या आनंदात भर टाकली आहे. आयपीएलच्या फ्रेंचायजींना बीसीसीआयने 15 नोव्हेंबरपर्यंत रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जमा करण्यास सांगितले असून आयपीएल 2024 साठी ट्रेडिंग विंडो खुली केली आहे.
फ्रेंचायजींकडे शिल्लक रक्कम-
- पंजाब किंग्ज – 12.20 कोटी
- मुंबई इंडियन्स – 50 लाख
- सनरायझर्स हैदराबाद – 6.55 कोटी
- गुजरात टायटन्स – 4.45 कोटी
- दिल्ली कॅपिटल्स – 4.45 कोटी
- लखनौ सुपर जायंट्स – 3.55 कोटी
- राजस्थान रॉयल्स – 3.35 कोटी
- रॉयल चॅलेंजर बंगळुरू – 1.75 कोटी
- कोलकाता नाईट रायडर्स – 1.65 कोटी
- चेन्नई सुपर किंग्ज – 1.5 कोटी.

























































