
प्रवासाचा अनुभव सुखद करण्यासाठी रेल्वेने नवीन अॅप लाँच केले आहे. PIPOnet या मोबाईल अॅपमध्ये ई-तिकिटासह पॅब बुकिंग आणि इतर काही सेवा मिळणार आहेत. प्रवाशांचा लांबचा प्रवास सुखद करण्यासाठी अॅपमध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मचीदेखील सुविधा मिळणार आहे.
थ्री आय इन्फोटेक, नुरे भारत नेटवर्क आणि रेलटेलने हे मोबाईल अॅप तयार केले आहे. अॅपमधून जी कमाई होईल त्यातील 40 टक्के वाटा हा नुरे भारत नेटवर्कला मिळणार आहे. या अॅपमध्ये जाहिरातीदेखील असणार आहेत. कंपनीने पुढील पाच वर्षांत अॅपमधून एक हजार कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवले आहे. नवीन अॅप येत्या दोन आठवडय़ांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे.



























































