
रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचं वृत्त आहे. रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. जर ते बदल लक्षात आले नाहीत, तर तिकीट बुक करताना अडचणी येऊ शकतात.
भारतीय रेल्वेने सीट बुकिंग कोड आणि कोच कोडमध्ये काही बदल केले आहेत. कोच कोड म्हणजे डब्याच्या प्रकारावरून पडलेला सांकेतिक क्रमांक आणि सीट कोड म्हणजे अर्थातच सीट बुकिंगचा सांकेतिक क्रमांक होय.
त्याचसोबत आता रेल्वे आपल्या अनेक ट्रेन्समध्ये व्हिस्टाडोम कोच आणणार आहे. तसंच थ्री टियर एसी डब्याची इकॉनॉमी श्रेणी देखील सुरू करण्यात येणार आहे. या डब्यात 83 बर्थ असतील तसंच यांचा दर देखील कमी असेल.
सध्या या नवीन कोच कोड आणि सीट कोड विषयी रेल्वेच्या सर्व झोन्सच्या विभाग प्रमुखांना माहिती देण्यात आली आहे. यात थर्ड एसी क्लास इकॉनॉमी डब्याचा कोचचा बुकिंग कोड 3E असा असेल तर कोचचा कोड M असेल. तसंच अनेक ट्रेन्समध्ये लागणाऱ्या व्हिस्टाडोम कोचचा कोड EV असा ठेवण्यात आला आहे.
सर्व नवीन बुकिंग कोड पुढील प्रमाणे आहेत
कोच क्लास बुकिंग कोड कोच कोड
व्हिस्टाडोम V.S. AC DV
स्लीपर S.L. S
एसी चेयरकार C.C C
थर्ड एसी 3A B
एसी थ्री टियर इकोनॉमी 3E M
सेकंड एसी 2A A
गरीब रथ एसी थ्री टियर 3A G
गरीब रथ चेयरकार CC J
फर्स्ट एसी 1A H
एक्झिक्युटिव्ह क्लास E.C E
अनुभूती क्लास E.A K
फर्स्ट क्लास F.C F
विस्टाडोम एसी E.V E.V



























































