रुद्राक्ष पाटीलचा जागतिक नेमबाजीत सुवर्णभेद, मराठमोळय़ा रुद्राक्षने मिळवले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मुंबईचा नेमबाज रुद्राक्ष पाटील याने शुक्रवारी (दि. 14) पैरो  येथे झालेल्या नेमबाजीच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 10 मीटर एअर रायफल प्रकारातील स्पर्धेत तो विश्वविजेता ठरला. दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रासोबत अशी कामगिरी करणारा रुद्राक्ष हा दुसरा हिंदुस्थानी नेमबाज आहे.

या सुवर्णपदकासह पाटील याला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. हिंदुस्थानचा हा दुसरा ऑलिम्पिक कोटा आहे. रुद्राक्ष हा मुंबईच्या पालघर जिह्यातील मूळ रहिवासी आहे. 18 वर्षीय रुद्राक्षने इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा 17-13 असा पराभव केला. एका क्षणी तो अंतिम सामन्यात पिछाडीवर होता. मात्र, त्यानंतर त्याने पुनरागमन करत सामना जिंकला. यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून ऑलिम्पिकसाठी चार कोटा उपलब्ध आहेत. हिंदुस्थानने अलीकडेच क्रोएशिया येथे झालेल्या शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या सापळय़ात विजेतेपद पटकावले होते.