अभिमानाचा क्षण! रिकी केज यांना दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार, फाल्गुनी शाहनेही उंचावली मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील संगीतक्षेत्रातल्या सर्वात प्रसिद्ध आणि तितक्याच प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांची घोषणा झाली आहे. हिंदुस्थानचे संगीतकार रिकी केज ‘डिव्हाईन टाइड्स’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रिकी केज यांनी दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. तसेच हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांना ‘अ कलरफूल वर्ल्ड’ या लहान मुलांच्या संगीत अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला.

64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा (Grammy Awards 2022) नुकताच रविवारी दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन लास वेगासमधील एमजीएम ग्रँड गार्डनच्या एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे करण्यात आले होते. यात रिकी केज यांनी संपूर्ण हिंदुस्थानींची मान अभिमानाने उंचावली.

रिकी केज यांना याआधी 2015 मध्ये ‘विंड्स ऑफ संसार’ या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.इतकेच नाही, तर त्या वेळी यूएस बिलबोर्ड न्यू एज अल्बम चार्टवरही या अल्बमने पहिले स्थान पटकावले होते. या चार्टवर पदार्पण करणारे रिकी पहिले भारतीय ठरले होते.

दरम्यान, हा सोहळा जानेवारीमध्ये लॉस अँजेलिस येथे पार पडणार होता. पण कोरोनामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला होता.

‘ग्रॅमी’ हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. 28 कॅटेगिरीमधील ग्रॅमी पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात आले. 64वा ग्रॅमी पुरस्कारामधील बेस्ट न्यू आर्टिस्ट या कॅटेगिरीमधील पुरस्कार हा ओलिविया रोड्रिगोला देण्यात आला तर साँग ऑफ द इयर अवॉर्ड हे ‘लीव द डोर ओपन’ या गाण्याने पटकवला.

विजेत्यांची नावे

बेस्ट न्यू आर्टिस्ट – ओलिविया रोड्रिगो
साँग ऑफ द इयर – लीव द डोर ओपन
बेस्ट रॉक अल्बम – फू फाइटर्स
बेस्ट रॉक साँग – फू फाइटर्स
बेस्ट रॉक परफॉर्मेंस – फू फाइटर्स
बेस्ट कंट्री अल्बम – स्टार्टिंग ओवर
बेस्ट प्रोग्रेसिव अल्बम – लकी डे
बेस्ट रॅप साँग – केन्ये वेस्ट
बेस्ट चिल्ड्रन अल्बम – फालू उर्फ फाल्गुनी शाह
बेस्ट कोरल परफॉर्मेंस- गुस्तावो डुडामेल, ग्रँटा गेशॉन, ल्यूक मॅकंडारफर
बेस्ट क्लासिकल कंटेम्पररी कम्पोजिशन – कॅरोलीन शॉ
बेस्ट पॉप सिंगर अल्बम – लव फॉर सेल
बेस्ट पॉप सोलो परफॉर्मेंस – ओलिविया रोड्रिगो
बेस्ट डांस/इलेक्ट्रनिक रिकॉर्डिंग – रूफुज डू सोल
बेस्ट म्यूजिक एडुकेटर – स्टीफन कॉक्स
प्रोड्यूसर ऑफ द इयर – जॅक एंटोनोफ
ट्रेडिशनल पॉप अल्बम – लव फॉर सेल