
इंडिगो एअरलाइनची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनने शनिवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत 2 हजार 536 कोटींचा एकत्रित तोटा झाला आहे. त्यामुळे कंपनी आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवर इंधनाच्या वाढलेल्या खर्चाचा भार प्रवाशांवर टाकणार आहे. यामुळे इंडिगोने विमान प्रवास करणे आणखी महाग होणार आहे.





























































