
जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (डब्ल्यूआयसीएफ) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज हिंदुस्थानने यूएईवर 17 धावांनी पराभव करून विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना 16 षटकांत 113 धावा केल्या तर यूएईने 96 धावा करताना जोरदार लढत दिली. 16 षटकांच्या सामन्यात हिंदुस्थानने चांगली सुरुवात करून दिली. हिंदुस्थानच्या चारही जोडय़ांनी अनुक्रमे 31, 17, 36 व 29 धावा करत एकूण 113 धावा करत मजबूत स्थिती मिळवली, तर हिंदुस्थानी गोलंदाजांनी यूएईच्या चारही जोडय़ांना अनुक्रमे 23, 38, 21 व 14 धावांवर रोखले. आजच्या सामन्यात यूएईने बलाढय़ हिंदुस्थानला जोरदार लढत दिली, मात्र हिंदुस्थानने 17 धावांनी विजय साजरा केला.


























































