
सामना प्रतिनिधी, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलमधील स्मारक 2020पर्यंत पूर्ण करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. सामाजिक न्याय विभाग व मुंबई महापालिकेच्या वतीने ओव्हल मैदानाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात आलेल्या अखंड भीमज्योतीचे प्रज्वलन व उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार राज पुरोहित, प्रसाद लाड, भाई गिरकर, कॅप्टन तमिल सेल्वन आदी उपस्थित होते.



























































