
सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असलेल्या एका दाम्पत्याने क्रूरपणाचा कळस गाठला आहे. दाम्पत्याच्या अज्ञानामुळे पोटच्या बाळाला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली आहे.
33 वर्षीय ओक्साना मिरोनोवा आणि 43 वर्षीय मॅक्सीम ल्युटीला पोलिसांनी त्यांच्या एक महिन्याच्या बाळाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. या दोघांच्या म्हणण्यानुसार, सूर्यप्रकाश घेतल्यावर शरीराला ऊर्जा मिळून पोट भरू शकतं. तपासात कळले की, रेडिकल रॉ फूडीस्ट ल्युटी आणि पत्नी मिरोनोवा एक क्लब चालवतात ज्याचे नाव ‘द लिव्हिंग मेन’ आहे. द सनच्या वृत्तानुसार, या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर कोर्टाने मिरोनोवाला दोन महिंन्यासाठी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर ब्लॉगर ल्यूटीने आपल्या बाळावर अजब न्यूट्रीशन आयडियाचा वापर केल्याचा आऱोप केला जात आहे. तपासात भूकेने त्या बाळाला निमोनिया झाल्याचे समोर आले आहे. रशियातील सोची रुग्णालयात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर रशियन तपास समितीने या दाम्पत्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक मीडियानुसार, खाण्या-पिण्याबद्दलचे त्याचे विचित्र नियम असायचे. त्यांच्या बाळाला सूर्यप्रकाशाशिवाय अन्न किंवा पाणी देऊ नये याची काळजी घेत असे आणि हेच त्या बाळाचे मृत्यूचे कारण बनले. झ्वेझदा न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, बाळाचा मृत्यू थकवा, भूक आणि न्यूमोनियामुळे झाला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.






























































