वर्ल्ड कप राऊंडअप – वॉर्नरची खेळपट्टी झाकण्यास मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आक्रमक  फलंदाजीसाठी आणि अभेद्य क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. मात्र, या क्रिकेटपटूने वर्ल्ड कप सामन्यादरम्यान सर्वांपुढे एक आदर्श ठेवत चाहत्यांची मने जिंकली. ऑस्ट्रेलिया-श्रीलंका लढतीदरम्यान लखनौमध्ये पावसाचा व्यत्यय आला होता. त्यावेळी  वॉर्नरने पावसात मैदानावरील कव्हर्स ओढण्यात ग्राऊंड स्टाफला मदत केली. 33 वे षटक सुरू होताच पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे खेळाडूंना मैदानातून बाहेर जावे लागले. स्टेडियममधील कर्मचारी खेळपट्टी झाकण्यासाठी धावले. हे पाहून ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मैदानावरील कर्मचाऱयांना खेळपट्टी झाकण्यात मदत केली.

अन् अपघातातून प्रेक्षक बचावले! 

ऑस्ट्रेलिया-श्रीलंका यांच्यात सोमवारी झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यात लखनौ येथील श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर प्रेक्षक एका अपघातातून थोडक्यात बचावले. स्टेडियममधील जाहिरातीचे फलक अचानक खाली कोसळले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलिया-श्रीलंका दरम्यानच्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला होता. दरम्यान, अचानक आलेल्या वादळामुळे स्टेडियममध्ये लावलेले जाहिरातीचे फलक खाली पडले. स्टेडियमच्या छतावर लावलेले फलक पडताना पाहून प्रेक्षक घाबरले.

गुरबाझला आयसीसीकडून दम

इंग्लंडकिरुद्ध ऐतिहासिक किजय मिळकून देण्यात महत्त्काची भूमिका निभाकणारा रहमानुल्लाह गुरबाझला रागाच्या भरात सीमा रेषेजकळ असलेल्या एका खूर्चीला बॅटने मारणे महागात पडले आहे. मैदानातील क्रिकेट उपकरण, कस्तूंचे नुकसान करून आचारसंहितेचे भंग केल्याप्रकरणी आयसीसीने त्याला फटकारले असून त्याला एक डीमेरिट अंकही दिला आहे. ही त्याची पहिलीच चूक असल्यामुळे त्याच्याकर कोणती कारकाई झालेली झालेली नसली तरी याची पुनराकृत्ती झाल्यास त्याला आर्थिक दंडासह सामन्याच्या बंदीलाही सामोरे जाके लागू शकते.