
जपानला रविवारी सायंकाळी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. उत्तर जपानमधील होक्काइडो प्रांताच्या काही भागांत 6.0 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू होक्काइडोच्या किनाऱ्यालगत 40 किलोमीटर खोलीवर नोंदवला गेला. भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आला नाही.
याआधी रविवारी पहाटे 2 वाजता टोकियो आणि आसपासच्या प्रांतांमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यात 40 हून अधिक लोक जखमी झाले. या भूकंपाचे केंद्र इबाराकी प्रांताच्या दक्षिण भागात 68 किलोमीटर खोलीवर होते.























































