अखेर तारीख ठरली, आयपीएल 2019 हिंदुस्थानातच होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंडियन प्रिमिअर लिग अर्थांत आयपीएल 2019 हिंदुस्थानातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयपीएलचे 12 व्या मोसमाची सुरुवात 23 मार्चपासून होणार असल्याचे बीसीसीआयने स्षष्ट केले आहे. त्यामुळे आयपीएलच्या 12 व्या मोसमाची तारीख नक्की कोणती असेल आणि ते कोठे होईल या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

माझं काय चूकलं? ‘IPL 2019’मध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूचे भावूक ट्वीट

बीसीसीआयने मंगळवारी दुपारी आयपीएलच्या 12 व्या मोसमासंदर्भात माहिती दिली. ‘सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त समितीसोबत मंगळवारी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आयपीएल 2019 च्या तारखा आणि ठिकाणांबाबत चर्चा करण्यात आली’, असे बीसीसीआयने सांगितले. तसेच केंद्र आणि राज्यातील अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर आयपीएलच्या 12 व्या मोसमाचे सर्व सामने हिंदुस्थानमध्येच घेतले होतील हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल 2019 ची सुरुवात 23 मार्चपासून होणार आहे. तसेच त्यापुढील कार्यक्रमाबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.

… तर या खेळाडूला लिलावात 25 कोटी मिळाले असते, गावस्करांचा खुलासा

याआधी हिंदुस्थानात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आयपीएलची तारीख अवलंबून असल्याचे बोलले जात होते. लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्यामुळे आयपीएलच्या तारखाही निश्चित करण्यात आलेल्या नव्हत्या. तसेच आयपीएलचा दुसरा मोसम (2009) दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला. निवडणुकीमुळेच ही स्पर्धा हिंदुस्थानऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती.