IPL 2020 – पडीकलचे पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक; धवन, वॉर्नरला दिला ‘धोबीपछाड’

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) संघात सामना रंगला. विराट कोहलीच्या आरसीबीने हैद्राबाद संघाचा 10 धावांनी पराभव केला. या लढतीत नवखा खेळाडू देवदत्त पडीकल चमकला. पदार्पणाचा सामाना खेळणाऱ्या पडीकलने दमदार अर्धशकत ठोकले.

सलामीला उतरलेल्या देवदत्त पडीकल याने हैद्राबादच्या गोलंदाजांची धुलाई करत ऍरोन फिंचसोबत मिळून 90 धावांची सलामी दिली. यात पडीकल याने सर्वाधिक योगदान देत अर्धशकत ठोकले. पडीकल याने 42 चेंडूत 56 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 8 वेळा चेंडू सीमापार टोलवला. या अर्धशतकासह पडीकल आयपीएलमध्ये पदार्पणाच्या लढतीत 50 धावांची खेळी करणारा दुसरा तरुण खेळाडू ठरला.

IPL 2020 – कोहलीचा ‘विराट’ विक्रम, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा कर्णधार

धवन, वॉर्नरला धोबीपछाड
पडीकल याने पदार्पणाच्या लढतीत (20 वर्ष 75 दिवस) अर्धशकत झळकावत शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांना ओव्हरटेक केले आहे. डेव्हिड वॉर्नर याने 2009 ला 22 वर्ष 187 दिवसांचा असताना अर्धशतक ठोकले होते, तर धवनने 2008 ला 22 वर्ष 136 दिवसांचा असताना अशी कामगिरी केली आहे. पडीकल याच्या पुढे फक्त श्रीवत्स गोस्वामी असून त्याने 2008 ला 19 गणेश 1 दिवसांचा असताना अर्धशकत ठोकले होते.

क्रिकेटसाठी मजुरी केली, IPL मध्ये ‘लॉटरी’ लागली; पहिल्याच लढतीत घेतला ‘विस्फोटक’ खेळाडूचा बळी

आरसीबीचा विजय
दरम्यान, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 163 धावा करत हैद्राबादपुढे 164 धावांचे आव्हान ठेवले. यानंतर चहलच्या 3 विकेट्सच्या बळावर हैद्राबाद संघाला 153 धावांवर रोखले आणि 10 धावांनी विजय मिळवला.

IPL 2020 – ‘हा’ एकमेव फास्ट बॉलर खेळलाय प्रत्येक आयपीएल, यंदा मुंबईकडून मैदान गाजवणार

आपली प्रतिक्रिया द्या