क्रिकेटसाठी मजुरी केली, IPL मध्ये ‘लॉटरी’ लागली; पहिल्याच लढतीत घेतला ‘विस्फोटक’ खेळाडूचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामात अनेक नवे खेळाडू आपला खेळ दाखवताना दिसत आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब लढतीतही असाच एक खेळाडू पहिल्यांदा आयपीएल खेळण्यासाठी मैदानात उतरला. अवघ्या 19 वर्षाच्या या खेळाडूला पंजाबच्या संघाने कोट्यवधी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले. सामान्य कुटुंबातून आलेल्या या खेळाडूने पहिल्याच लढतीत विस्फोटक खेळाडू ऋषभ पंत याला बाद करत चांगली सुरुवात केली. हा खेळाडू आहे फिरकीपटू रवि बिश्नोई. (Ravi Bishnoi)

शायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला लाजिरवाणा विक्रम

अंडर-19 स्पर्धेत आपली छाप उमटवलेल्या रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) याला पंजाबच्या संघाने 2 कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले. पंजाबचा कोच अनिल कुंबळे याने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याचा अंतिम 11 खेळाडूत समावेश केला आणि पदार्पणाची संधी दिले. या संधीचे सोने करत रवि बिश्नोई याने श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना अडचणीत आणणारे चेंडू टाकले. यात पंत फसला आणि रवि बिश्नोईने आयपीएलमधील पहिला बळी मिळाला.

IPL 2020 – ना मुंबई, ना चेन्नई, ‘हा’ संघ मारणार बाजी, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

संपूर्ण लढतीत त्याने शानदार गोलंदाजी करत 4 षटकात 22 धावा दिल्या आणि पंतचा बळी मिळवला. रवि बिश्नोई याने केलेल्या दमदार गोलंदाजीची प्रशंसा अनिल कुंबळेनेही केली आणि त्याचा स्पेल संपताच टाळ्या वाजवत त्याला प्रोत्साहित केले.

IPL 2020 – कल भी, आज भी..! पहिल्या सिझनपासून खेळताहेत ‘हे’ 13 खेळाडू

क्रिकेटसाठी केली मजुरी
रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) हा राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी आहे. क्रिकेटसाठी 12 वर्षांचा असताना त्याने मजुरीही केली आहे. क्रिकेट खेळण्यासाठी त्याने एका क्रिकेट अकादमीच्या निर्माण करण्यात भाग घेतला होता. सिमेंटच्या गोण्या उचलण्यापासून दगड फोडण्यापर्यंतचे काम त्याने केले आहे. मजुरीतून मिळालेले पैसे त्याने येथे पिच तयार करायला दिले आणि तिथे सराव सुरू केला.

सॅमसनची तुफानी खेळी, अशी कामगिरी करणारा RR चा पहिला खेळाडू; राहुलच्या विक्रमाचीही केली बरोबरी