शायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला लाजिरवाणा विक्रम

यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पाचव्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 195 धावा उभारल्या. यात कर्णधार रोहित शर्मा याने 80 धावांचे योगदान दिले. त्याला सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांनी चांगली साथ दिली. मात्र अतिआत्मविश्वासाने पांड्याचा घात केला आणितो हिटविकेट झाला. यासह त्याच्या नावावर लाजिरवाणा विक्रम जमा झाला.

IPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग, सचिनला मागे सोडलं

मुंबईने रोहित शर्माच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर खोऱ्याने धावा खेचल्या. रोहित बाद झाल्यानंतर ही जबाबदारी हार्दिक पांड्यावर आली. त्यानेही काही फटके मारत आशा जागवल्या. मात्र 19 व्या षटकात एका यॉर्कर चेंडूला टोलवण्याचा नादात त्याची बॅट स्टंपला लागली आणि तो 18 धावा काढून हिटविकेट झाला.

IPL 2020 – रोहित शर्माचे अनोखे ‘द्विशतक’, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा खेळाडू

रसेलच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर पांड्या बाद झाला. तत्पूर्वी त्याने 12 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. दरम्यान, आयपीएलमध्ये हिटविकेट होणारा तो 11 वा खेळाडू असून रसेलला अशा पद्धतीने पहिल्यांदाच विकेट मिळाली.

IPL 2020 – दिल्लीच्या नावावर अजब विक्रम, चेन्नईला 3 देशात पराभवाचे पाणी पाजणारा पहिला संघ

आपली प्रतिक्रिया द्या