IPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग, सचिनला मागे सोडलं

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के.एल. राहुल याने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दणदणीत शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर पंजाबच्या संघाने बंगळुरूवर 97 धावांनी विजय मिळवला. राहुलने विराट कोहलीने दिलेल्या 2 जीवदानाचा फायदा उठवत 69 चेंडूत नाबाद 132 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 7 षटकार लगावले. या शतकी खेळीसह राहुलने 5 विक्रम आपल्या नावावर केले.

IPL 2020 – सलग दुसऱ्या पराभवासह सीएसकेने नोंदवला लाजिरवाणा विक्रम

आयपीएलमध्ये कोणत्याही संघाच्या कर्णधाराने सर्वोच्च धावा ठोकण्याचा विक्रम आता राहुलच्या नावावर जमा झाला आहे. आयपीएलमध्ये सर्वोच्च धावा ठोकणारे कर्णधार

1. के. एल. राहुल – नाबाद 132 (2020)
2. डेव्हिड वॉर्नर – 126 (2017)
3. वीरेंद्र सेहवाग – 119 (2011)
4. विराट कोहली – 113 (2016)
5. विराट कोहली – 109 (2016

IPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट होतोय भयंकर ट्रोल

आयपीएलमध्ये कोणत्याही हिंदुस्थानी खेळाडूने सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम आता राहुलने आपल्या नवे केलाय. त्याने पंतचा विक्रम मोडला.

1. के. एल. राहुल – नाबाद 132 (2020)
2.ऋषभ पंत – नाबाद 128 (2018)
3. मुरली विजय – 127 (2010)
4. वीरेंद्र सेहवाग – 122 (2014)
5. पॉल वाल्थली – नाबाद 120 (2011)

IPL 2020 – दिल्लीच्या नावावर अजब विक्रम, चेन्नईला 3 देशात पराभवाचे पाणी पाजणारा पहिला संघ

आयपीएलमध्ये कर्णधार आणि खेळाडू म्हणून खेळताना शतक ठोकणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत आता राहुलचा समावेश झालाय.

1. वीरेंद्र सेहवाग
2. डेव्हिड वॉर्नर
3. के. एल. राहुल

Photo story – आयपीएलमध्ये एकही चौकार न मारता अर्धशतक ठोकणारे 5 खेळाडू

राहुलने पंजाबसाठी सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम केला असून त्याने सेहवागला मागे सोडले आहे.

1. के. एल राहुल – नाबाद 132 (2020)
2. वीरेंद्र सेहवाग – 122 (2014)

आयपीएलमध्ये वेगाने 2000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता राहुलचा समावेश झाला आहे. राहुलने सचिन तेंडुलकर याचा विक्रमही मोडला आहे.

1. ख्रिस गेल – 48 डावात 2000 धावा
2. के. एल. राहुल – 60 डावात 2000 धावा
3. सचिन तेंडुलकर – 63 डावात 2000 धावा

आपली प्रतिक्रिया द्या